Bharat Gogawale : अखेर भरत गोगावले यांना मिळाला झेंडावंदनाचा मान

सरकारकडून ध्वजवंदन करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर
Bharat Gogawale flag hoisting
Bharat Gogawale file photo
Published on
Updated on

मुंबई : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजून सुटलेला नसला, तरी स्वराज्याच्या राजधानीत झेंडावंदन करण्याचा मान अखेर भरत गोगावले यांना मिळाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्र्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी ध्वजवंदन करणाऱ्या मंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर केली. त्यात रायगड जिल्ह्यासाठी मंत्री अदिती तटकरे यांच्याऐवजी यंदा गोगावले यांना संधी देण्यात आली आहे.

रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावरून अनुक्रमे शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट आणि भाजप विरुद्ध शिंदे गटात रस्सीखेच आहे. गेल्या दोन राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात मंत्री तटकरे यांना ध्वजवंदनाचा मान मिळाला होता. यंदा हा मान मंत्री गोगावले यांना देण्यात आला आहे. याशिवाय, ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुण्यात अजित पवार ध्वजवंदन करतील. 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील 36 जिल्ह्यांत ध्वजवंदन करणाऱ्या मंत्र्यांची यादी बुधवारी सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली.

Bharat Gogawale flag hoisting
Sanjay Raut | शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई करा : संजय राऊत

त्यानुसार, नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर राधाकृष्ण विखे-पाटील, सांगली चंद्रकांत पाटील, नाशिक गिरीश महाजन, पालघर गणेश नाईक, जळगाव गुलाबराव पाटील, अमरावती दादा भुसे, यवतमाळ संजय राठोड, मुंबई (शहर) मंगलप्रभात लोढा, रत्नागिरी उदय सामंत, सिंधुदुर्ग नितेश राणे, धुळे जयकुमार रावल, जालना पंकजा मुंडे, नांदेड अतुल सावे, चंद्रपूर अशोक उईके, सातारा शंभूराज देसाई, मुंबई (उपनगर) आशिष शेलार, वाशिम दत्तात्रय भरणे, लातूर शिवेंद्रसिंह भोसले, सोलापूरमध्ये जयकुमार गोरे, नरहरी झिरवळ, भंडारा संजय सावकारे ध्वजवंदन करणार आहेत.

Bharat Gogawale flag hoisting
Mumbai Gold price hike : मुंबईत 1,75,830 रुपये तोळा झाले सोने ; एकाच दिवसात तोळ्यामागे 10 हजार रुपयांची वाढ

छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट, धाराशिव प्रताप सरनाईक, बुलडाणा मकरंद जाधव (पाटील), अकोला आकाश फुंडकर, बीड बाबासाहेब पाटील, कोल्हापूर प्रकाश आबिटकर, गडचिरोली आशिष जयस्वाल, वर्धा पंकज भोयर, परभणी मेघना साकोरे-बोर्डीकर, गोंदिया इंद्रनील नाईक, तर नंदुरबार जिल्ह्यात योगेश कदम ध्वजवंदन करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news