Bhandup Gutkha Seizure: भांडुप पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; १.१८ कोटींचा मुद्देमाल जप्त; नऊ जण ताब्यात

भांडुप पोलिसांनी नाहूर-विक्रोळी रोड परिसरात कारवाई करत २०.२१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित सुपारी आणि ९८ लाखांची पाच वाहने जप्त केली. नऊ जण ताब्यात.
Bhandup Gutkha Seizure
Bhandup Gutkha SeizurePudhari
Published on
Updated on

मुलुंड: प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित सुपारीची वाहतूक करणाऱ्यांवर भांडुप पोलिसांनी मोठी कारवाई केली. नाहूर येथील महापालिका पार्किंग, विक्रोळी रोड परिसरात शनिवारी पहाटे पोलिसांनी सापळा रचून पाच वाहने पकडली.

या वाहनांमधून २० लाख २१ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित सुपारी जप्त करण्यात आली. तसेच पाच वाहनांची किंमत ९८ लाख रुपये आहे. त्यामुळे १ कोटी १८ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Bhandup Gutkha Seizure
Mumbai Ganesh Idol Immersion: भरती-ओहोटी बघूनच बाप्पाचे विसर्जन करा! विसर्जन करताना सावधगिरी बाळगण्याचे मुंबई महापालिकेचे आवाहन

भांडुप पोलिसांना प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित सुपारीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विनोद लाड आणि त्यांच्या पथकाने नाहूर परिसरात सापळा लावला. शनिवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास संशयित वाहने तेथे आली. पोलिसांनी ती अडवून तपासणी केली.

या कारवाईत एक कंटेनर, दोन टेम्पो, एक बोलेरो आणि एक पिकअप अशी पाच वाहने पकडण्यात आली. वाहनांची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित सुपारी आणि तंबाखू आढळून आला.

पोलिसांनी मालासह नऊ जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा माल कुठून आणला आणि तो कुठे विक्रीसाठी नेण्यात येत होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news