काळजी घ्या ! डेंग्यूनंतर मुंबईत चिकनगुनियाचेही रुग्ण वाढले

राज्यातही गेल्या तीन वर्षांत रुग्णसंख्येत वाढ
Mumbai
मलेरिया, डेंग्यू या साथीच्या आजारांबरोबरच राज्यात चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. Pudhari News Network
Published on
Updated on

मुंबई : मलेरिया, डेंग्यू या साथीच्या आजारांबरोबरच राज्यात चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. याबाबत राज्यात मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. डासांमुळे होणार्‍या चिकनगुनियाचेही प्रमाण गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत वाढले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत 119 तर राज्यात एकूण 900 रुग्ण आढळले आहेत.

राज्याच्या महापालिका क्षेत्रातमध्ये मुंबईत सर्वाधिक मलेरिया आणि डेंग्यूचे रूग्ण आढळले आहेत. हा आजार होणार्‍या डासांपासून मुंबईकरांचे संरक्षण करण्यार्‍या उपयोजना फेल ठरल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत मुंबईत 2024 मध्ये चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये चिकनगुनियाचे केवळ 18 रुग्ण आढळले. 2024 मध्ये ही संख्या 250 होती. यावर्षी पाच महिन्यांत 119 जणांमध्ये चिकनगुनियाची पुष्टी झाली आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, घरांमध्ये डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे आढळत असून त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियाचे रुग्ण अधिक आढळून आले आहेत.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महापालिका क्षेत्रात मुंबईनंतर अकोला 109, सांगली मिरज 24 , नाशिक 20, ठाणे 14, जिल्ह्यामध्ये पुण्यात सर्वाधिक रुग्ण असून पुणे जिल्ह्यात 104 रूग्ण, अकोला 85, पालघर 69, सिंधुदुर्ग 44, ठाणे 35 आढळले आहेत.

Mumbai Latest News

रुग्णसंख्येचा वाढता आलेख

  • 2020 782

  • 2021 2526

  • 2022 1087

  • 2023 1702

  • 2024 5854

  • 2025 900

Mumbai
Dengue virus cases : मुंबई डेंग्यूची राजधानी

चिकुनगुनिया विषाणूजन्य आजार

चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे, जो मुख्यत्वे एडिस डासामुळे पसरतो. हे डास विशेषतः दिवसा सक्रिय असतात आणि संक्रमित व्यक्तीचे रक्त शोषल्यानंतर ते इतर लोकांना संक्रमित करू शकतात. चिकनगुनिया विषाणूच्या लक्षणांमध्ये ताप, तीव्र सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, त्वचेवर पुरळ उठणे आणि थकवा यांचा समावेश असू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news