Basmati Rice Price Hike: दिवाळीत तांदूळ आणखी महागणार? बासमतीच्या दरात मोठी वाढ

पावसामुळे कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणात उत्पादनात ३५ टक्क्यांनी घट
Basmati Rice Price Hike
Basmati Rice Price HikePudhari
Published on: 
Updated on: 

राजेंद्र पाटील

नवी मुंबई: बासमती तांदळाचे उत्पादन घेणाऱ्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये यावर्षी घाऊक सराससरीपेक्षा चाळीस टक्के पाऊस कमी झाल्याने त्याचा फटका बासमती तांदळाच्या उत्पादनाला थेट बसला आहे.

यामुळे या चार राज्यांतील बासमती तांदळाचे उत्पादन ३० ते ३५ टक्के घटणार आहे. परिणामी, सर्व प्रकारच्या बासमती तांदळाच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी दरवाढ झाली असून, दिवाळीत आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे.

Basmati Rice Price Hike
Eknath Shinde controversy : आता पुरे! आरोप-प्रत्यारोप विसरा... एकनाथ शिंदे यांनी वादावर टाकला पडदा

तिबार, मोगरा, कोलम, इंद्रायणी, परिमल तांदळाच्या दरातही वाढ झाली असून, या सहा प्रकारच्या तांदळाची किंमत क्विंटलमागे पाच ते तीस टक्क्यांनी वाढली. सर्वाधिक दरवाढ बासमती, तिबार, कोलम या जातीच्या तांदळांमध्ये झाली आहे.

याबाबत दै. ’पुढारी’शी बोलताना मुंबई एपीएमसीतील घाऊक व्यापारी निलेश वीरा यांनी सांगितले की, मुंबई एपीएमसीत सुमारे ५० जातीच्या तांदळाची आवक होते. त्यापैकी २५ जातींच्या तांदळाला चांगली मागणी आहे.

Basmati Rice Price Hike
Jio IPO: जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओने रचला जागतिक इतिहास; १ कोटीहून अधिक अर्जांचा टप्पा ओलांडणारा पहिला आयपीओ

एपीएमसी घाऊक बाजारात जून २०२१ मध्ये बासमती ९५ ते १०० रुपये किलो, तर जून २०२२ मध्ये ८५ ते ९० रुपये किलो होता. मात्र सप्टेंबर २०२३च्या सुरुवातीपासून बासमतीचा दर १०० ते ११० रुपयांवर पोहोचला. तोच बासमती ऑक्टोबर २०२६ मध्ये १२५ रुपये किलोवर पोहचला. पंजाब, हरियाणा या राज्यांतून मुंबई एपीएमसीत दररोज १५० टन बासमती तांदळाची आवक होते.

तांदूळ येतो कुठून

कोलम - नागपूर

वाडा सुरती कोलम - महाराष्ट्र

परिमल - पंजाब (रेशनिंगसाठी वापर)

इंद्रायणी - पुणे

मोगरा - पंजाब, हरियाण

मसुरी - मध्य प्रदेश

दुबार - पंजाब, हरियाणा

बासमती - पंजाब, हरियाणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news