

पुढारी ऑनलाईन डेस्क: बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूवरील अत्याचाराविरोधात आज (दि.१०) राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. नागपुरातील सहा विधानसभा मतदारसंघातून सकल हिंदू समाजाच्या वतीने एकत्रित येत निषेध नोंदवला. नागपुरातील वेगवेगळ्या भागातून निघणारे हे सकल हिंदू समाजाचे मोर्चे व्हेरायटी चौकात एकत्र आले.
हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्याची मागणी सरकारकडे करत आहे. भारतीय हिंदू समाज हा बांगलादेश मध्ये असलेल्या अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या पाठीशी आहे. अशा पद्धतीचे बळ देण्याचे काम करत आहे. यावेळी हातात बॅनर आणि भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.
जालन्याच्या परतूर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आली बांगलादेश हिंदू न्याय यात्रा. हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा यावेळी निषेध केला. जोरदार घोषणांनी परिसर दणाणला होता. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा मोर्चात सहभाग होता.
बांगलादेशातील हिंदूवर होणारा अन्याय अत्याचार थांबवा, या मागणीसाठी बीड, माजलगाव, परळी शहरासह जिल्हाभरात मोर्चा काढून प्रशासनास निवेदन देण्यात आले. बीड जिल्हा वकील संघाने प्रशासनास निवेदन दिले. बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय, अत्याचाराच्या निषेधार्थ निलंगा बंद आणि धरणे आंदोलन करण्यात आले.
हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात यवतमाळमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशमध्ये हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांक समुदायावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ यवतमाळ शहरात सकल हिंदू बांधवांनी भगवा ध्वज हातात घेऊन भव्य रॅली तसेच पदयात्रा काढून भव्य मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशमध्ये हिंदूंचे मंदिर पाडण्यात आले सर्रासपणे हिंदू वर अत्याचार होतात. हिंदू जर सुरक्षित नसेल. तर आम्ही सीमा पार करू, अशी चेतावणी सकल हिंदू समाज बांधवांनी बांगलादेश सरकारला दिली.
पूर्णा येथील जुना मोंढा भागातील श्रीराम मंदिरासमोर सकल हिंदू बांधवांनी बांगला देशाचे राष्ट्रपती मोहम्मद युनूस यांच्या प्रतिकात्मक तैलचित्र पुतळ्याचे दहन केले. असंख्य सकल हिंदू बांधवांनी हनुमान चालीसा पठण करत प्रभू श्रीरामाची आरती करुन मूक मोर्चा काढला.
बांगलादेश मध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर अन्याय अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने हिंदू समाज बांधवांनी एकत्रित येऊन मोर्चाचे आयोजन केले होते गंगाखेड तहसीलदार यांना निवेदन देऊन समारोप करण्यात आला.
बांग्लादेश येथे मुस्लिम कट्टरपंथीयांकडून हिंदू व अन्य अल्पसंख्याक समाजावर , मंदिरावर होत असलेल्या अन्याय, अत्याचार व हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट मूक मोर्चा काढून कडकडीत बंद पाळला.
बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदू व बुद्ध समुदायावर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध पैठण शहरातील बस स्थानक चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.
पिंपळनेर शहरातील गांधी चौकात एकत्र येऊन तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यासाठी हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बांगलादेशाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार नाशिककर यांना भागवताचार्य मकरंदजी वैद्य, श्रीराम मंदिराचे सर्वेश्वरदास महाराज, विठ्ठल मंदिर संस्थानचे योगेश्वर महाराज देशपांडे, हभप विजय महाराज काळे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्कदिनी मंगळवारी (दि.10) किनवट तालुक्यातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते उप-जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘बांगलादेश हिंदू न्याय यात्रा’ काढली.
गडचिरोली : बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज (दि.१०) गडचिरोलीतही 'हिंदू न्याय यात्रा' काढण्यात आली. शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावरुन सुरु झालेल्या या न्याययात्रेचे आयटीआय चौकातील पटांगणावर सभेत रुपांतर झाले. याप्रसंगी माजी आमदार डॉ.देवराव होळी, विश्व हिंदू परिषदेचे बाबासाहेब कहारे यांच्यासह असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते. हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी बांग्लादेश सरकारने कडक पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या यात्रेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांच्या कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील हिंदू बांधव सहभागी झाले होते.