PM Jan Arogya Yojana : ‘जनआरोग्य’मधील उपचारांची संख्या वाढवणार

पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या उपचारांसाठी कॉर्पस निधी
PM Jan Arogya Yojana
‘जनआरोग्य’मधील उपचारांची संख्या वाढवणारpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : केंद्र सरकारची प्रधानमंत्री जनआरोग्य आणि राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या 1 हजार 356 वरून 2 हजार 399 पर्यंत वाढविण्यात येणार आहे. सोबतच, पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी कॉर्पस फंड तयार करण्यास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नियामक परिषदेच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आरोग्य हमी सोसायटीची बैठक पार पडली. बैठकीस अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होते. तसेच, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या उपचारांसाठी वेगळा कॉर्पस निधी उभारण्याचा व या निधीतून हृदयप्रत्यारोपण, फुप्फुस प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण यांसह 9 विविध उपचारांची शिफारस बैठकीत मान्य करण्यात आली.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  • महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत आता 2 हजार 399 आजारांवर मिळणार वैद्यकीय उपचार

  • प्राथमिक आरोग्य केंद्रांवर 25 आजारांवरील उपचारांना मान्यता

  • सर्व ग्रामीण, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे योजनेत समाविष्ट होणार

  • उपचारांच्या दरनिश्चितीला मंजुरी

  • रुग्णालयांना श्रेणीनुसार दर देण्याची पद्धत बंद करून राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या धोरणानुसार गुणवत्ता प्रमाणपत्रधारक - रुग्णालयांना, आकांक्षित जिल्ह्यांतील रुग्णालयांना प्रोत्साहनपर अधिकची रक्कम देणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news