

मुंबई: अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार असून 40 आमदार भारतीय जनता पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपच्या मित्र पक्षातील एकूण 40 आमदार त्यांच्यात विलीन होणार आहेत अशा चर्चा आम्हीही ऐकत असतो, असे विधान केले.
रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते आहेत, ते फुटीबद्दल बोलत आहेत. खरोखरच भारतीय जनता पक्ष अशी फूट घडवून आणणार आहे काय? या विषयावर लोंढे यांनी हे उत्तर दिले. भारतीय जनता पक्षाचे मित्र असलेल्या सहकाऱ्यांमधूनच काही आमदार पक्षांतर करणार आहेत.
मित्रपक्षातील 40 आमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करायला तयार असल्याचे आम्हीही ऐकतो आहोत, असे ते म्हणाले. आज नीट परीक्षेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड अन्याय झाला आहे. सरकार या गोंधळाला जबाबदार आहे.
या प्रकरणात सीबीआय करत असलेली कारवाई ही अत्यंत त्रोटक आहे. विद्यार्थ्यांचे आयुष्य अशा प्रकारामुळे संकटात येते आहे याकडेही लोंढे यांनी लक्ष वेधले. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे देश महागाईच्या वणव्यात लोटला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.