Extortion case : अटकेची भीती दाखवून 4.62 कोटी उकळले

आयआयटीच्या निवृत्त महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची फसवणूक, बँक खाती पुरविणाऱ्या दोन आरोपींना अटक
crime news
Extortion case : अटकेची भीती दाखवून 4.62 कोटी उकळलेFile Photo
Published on
Updated on

मुंबई : अटकेची भीती दाखवून एका वयोवृद्ध महिलेची 4 कोटी 62 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत ही फसवणूक झाली असून सायबर सेल पोलिसांनी नरेंद्र एस. सिन्हा आणि गुंजन देवकुमार दिनेशचंद्र या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्यावर फसवणुकीसाठी बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे.

फसवणूक झालेली महिला 74 वर्षांची वयोवृद्ध असून आयआयटीमधून मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त आहे. सध्या ती पतीसोबत पवई परिसरात राहते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अज्ञात सायबर ठगांनी ट्रायसह दिल्ली पोलीस दलातील अधिकारी असल्याची बतावणी करुन तिच्याविरुद्ध शारीरिक शोषणासह मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करुन तिची या दोन्ही गुन्ह्यांत चौकशी होणार आहे.

crime news
Mumbai redevelopment project : प्रतीक्षानगर संक्रमण इमारतींचा होणार पुनर्विकास

या चौकशीनंतर तिच्यावर अटकेची कारवाई केली जाईल असे सांगून तिला तपासात सहकार्य करण्यास सांगितले होते. तिच्याकडे तिच्या कुटुंबीयांसह बँकेचा तपशील मागण्यात आला होता. तिने सर्व माहिती सांगितल्यानंतर त्यांनी तिला तिच्या बँक खात्यातील रक्कमेसह एफडी आणि आरडी तोडण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर तिला ती रक्कम त्यांनी दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते.

कारवाईसह अटकेच्या भीतीने तिने त्यांना ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत 4 कोटी 62 लाख रुपये ट्रान्स्फर केले. चौकशीनंतर तिला तिची रक्कम परत मिळेल असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी तिची रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली नाही. त्यानंतर तिची साधी चौकशी केली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करून फसवणूक करणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर पश्चिम सायबर सेल विभागाकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन नरेंद्र सिन्हा आणि गुंजन दिनेशचंद्र या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता.

crime news
Foreign birds migration : विदेशी पक्ष्यांची नवजननी कोकण किनारपट्टी

अटक आरोपींनी फसवणुकीसाठी सायबर ठगांना विविध बँकेत खाती उघडून दिले होते. त्यांच्या बँक खात्यात फसवणुकीची ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम काढून त्यांनी सायबर ठगांना दिली होती. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती. ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.

  • 2020 पासून गेल्या पाच वर्षांत सायबर फसवणुकीची 20 हजार प्रकरणे समोर आली असून यात सुमारे दोन हजार कोंटींची लूट झाली आहे. यात डिजीटल अटकेचे प्रमाण अलीकडे वाढले असून ते निवृत्त महिला अधिकाऱ्यांना टार्गेट करीत आहेत.

  • या गुन्ह्यांत उकल होण्याचे प्रमाण अल्प आहे. जे काही गुन्हे उकल होत आहेत, यात सायबर ठगांना केवळ बँक खाती पुरवणारे आरोपी सापडत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news