अनंत-राधिकाच्या लग्नाआधी भंडारा; अंबानींच्या Antilia बंगल्याबाहेर जेवणासाठी रांगा 

अनंत अंबानी-राधिक मर्चंट यांचा विवाहसोहळा उद्या
Anant Ambani and Radhika Merchant
अनंत-राधिकाच्या लग्नाआधी भंडाराFile Poto
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांनी लग्ना अगोदर  त्यांच्या मुंबईतील अँटी निवासस्थानी 'भंडारा' आयोजित केला होता. या कार्यक्रमात भव्य मेजवानी होती. अंबानीच्या Antilia बंगल्याबाहेर जेवणासाठी रांगा लागल्या होत्या. मेजवानी आणि रांगांचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होवू लागले आहेत. Anant Ambani and Radhika Merchant

बंगल्याबाहेर जेवणासाठी रांगा

गेले काही दिवस मुकेश आणि नीता अंबनी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.  उद्या (दि.१२) दोघांचा विवाह आहे. तत्पूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी त्यांच्या मुंबईतील अँटी निवासस्थानी उदार 'भंडारा' आयोजित केला होता. या कार्यक्रमात  भव्य मेजवानी होती. मेजवानीला लोकांची संख्या बरीच होती. जेवणासाठी रांगा लागल्या होत्या. रांगांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होवू लागले आहेत.

Anant Ambani and Radhika Merchant
राधिका मर्चंट होणार अंबानी कुटुंबाची सून

कोण आहे अंबानींची भावी सून ?

मुकेश आणि नीता अंबनी यांची भावी लहान सून राधिका मर्चंट सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. अनंत अंबानीसोबत १२ जुलैला राधिकाचा विवाह होत आहे. राधिका मर्चंट नेमकी कोण आहे, याबद्दल सध्या लोकांमध्ये बरेच कुतुहल आहे.

राधिका ही विरेन आणि शैला मर्चंट यांची कन्या आहे. विरेन मर्चंट Encore Healthcare चे सीईओ आहेत, आणि देशातील अब्जाधिशांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. Encore Natural Polymers, Encore Business Centre Private Limited अशा विविध कंपन्यांचे ते मालक आहेत. तर शैला मर्चंट या Encore Healthcareच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. मर्चंट कुटुंबीयांची नेटवर्थ जवळपास ७०० कोटी रुपयांची आहे.

Anant Ambani and Radhika Merchant
मुकेश अंबानी यांनी घेतली सोनिया गांधींची भेट

कधी आहे विवाह सोहळा?

अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांचे लग्न १२ जुलैला होत आहे. त्यांचा साखरपुडा जानेवारी २०२३ला झाला. सध्या प्री वेडिंगचे विविध कार्यक्रम होत असून यासाठी जगभरातील दिग्गजांची उपस्थितीती आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news