मुंबई : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (सोमवार) दुपारी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, दीपक केसरकर, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे आदी महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीचे सर्वच महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत असूनही त्यांच्यासोबत येणे टाळले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असणारे अमित शहा आजच दिल्लीला परत जाणार आहेत.