

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात गुरुवारी दुपारी वंचित बहुजन आघाडीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील मुंबई महापालिकेसमोर निदर्शने करत केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्या राजीनामाची मागणी वंचित आघाडीने केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने झाली.
यावेळी संतप्त झालेल्या आंबेडकर कार्यकर्त्यांनी 'जय संविधान', 'जय भीम,जय भारत' , आर एस एस निषेधाचे फलक आणले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जय भिम, जय भिम हल्लाबोल च्या घोषणा देत संताप व्यक्त केला. यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी ठिय्या केला. या निदर्शनासाठी परिसरात मुंबई पोलिसांचा फौजफाटा होता. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कार्यकर्ते या निदर्शनात सहभागी झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांची गर्दी वाढली.