डॉ. आंबेडकरांनी जनसामान्यांच्या वेदनेला आवाज देण्याचे काम मुंबईनगरीतून केले : मुख्यमंत्री

CM Devendra Fadnavis | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
CM Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय चळवळीचे अनुष्ठान मुंबईत केल्याचे पाहायला मिळते. मुंबई प्रांताच्या विधीमंडळामध्ये १९१२६ साली जेव्हा बाबासाहेब गेले, तेव्हा शोषीत, पीडित, जनसामान्यांच्या दु:खाला, वेदनेला आवाज देण्याचे काम याच मुंबईच्या महानगरीतून त्यांनी गेले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१४) केले. (CM Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, खोट्या प्रथा, गुलामगिरीचा पगडा असलेल्या वतनाबाबत त्यांनी ठोस निर्णय घेण्यास याच नगरीतून भाग पाडले. त्यांनी आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना मुंबईतच केली. मुंबईच्या भायकळा मतदारसंघातून त्यांनी १९३७ मध्ये प्रांतिक विधानसभेची निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली. जगातील सर्वोत्कृष्ट संविधान बाबासाहेबांनी देशाला दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news