पवार घराण्यात फूट पाडून मोठी चूक केली; अजित पवार यांची कबुली

Maharashtra Politics | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली
Ajit Pawar
पवार घराण्यात फूट पाडून मोठी चूक केलीFile Photo
Published on
Updated on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण पवार घराण्यात फूट पाडून चूक केल्याची कबुली शनिवारी एका कार्यक्रमात दिली. धर्मरावबाबा आत्राम यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी ही कबुली दिली.

आपल्या वडिलांच्या विरोधात बंडाचा झेंडा उगारलेल्या आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना त्यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, घरात फूट पाडून मी चूक केली. आता अशी चूक तुम्ही करू नका. वडील सर्वात जास्त प्रेम आपल्या मुलीवर करतो. त्यामुळे नात्यात दुही निर्माण करू नका, धर्मरावबाबा आत्राम यांच्याबरोबरच राहा. नात्यातील फूट समाजाला आवडत नाही. त्याचा अनुभव आम्ही घेतला आहे, असे अजित पवार म्हणाले. ­­­वस्ताद एक डाव कायम आपल्याकडे राखून ठेवत असतो, तो शिष्याला सांगत नाही. तो डाव आम्हाला वापरायला लावू नका, असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाग्यश्री आत्राम यांना दिला आहे.

Ajit Pawar
Maharashtra Politics | भाजपचा नाद सोडला! एकनाथ खडसेंनी घेतला मोठा निर्णय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news