Ajit Pawar Plane Crash: विमानातील दोन्ही फ्लाईट रेकॉर्डर जळाले मात्र... अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मोठी बातमी

Ajit Pawar Plane Crash
Ajit Pawar Plane Crashpudhari photo
Published on
Updated on

Ajit Pawar Plane Crash Flight Recorder Update: अजित पवार यांच्या विमान अपघात तपासाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवार यांच्या अपघात झालेल्या विमानात दोन स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर होते. या दोन स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डरबाबत AAIB कडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे.एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ही भारतातील विमान अपघाताची चौकशी करणारी संस्था आहे. त्यांनी अजित पवार यांच्या विमानातील हे दोन्ही स्वतंत्र फ्लाईड रेकॉर्डर हे पूर्णपणे जळाले असल्याचं सांगितलं.

Ajit Pawar Plane Crash
Ajit Pawar's plane crash case | आ. रोहित पवार घेणार खासगी गुप्तहेरांची मदत

काय म्हणाले AAIB ?

दरम्यान, AAIB ने अजित पवार यांच्या विमान अपघात तपासात डेटा मिळवण्यासाठी स्वतंत्र सहकार्य घेणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी जरी प्रचंड मोठ्या आगीमुळं अजित पवार यांच्या विमानातील दोन्ही फ्लाईट रेकॉर्डर हे पूर्णपणे जळाले असले तरी फ्लाईट रेकॉर्डर लॅबमध्ये यातील डेटा डाऊनलोड करण्यात यश मिळालं आहे.

AAIB ने पुढं सांगितलं की, अजित पवार यांच्या विमान अपघातातील तपासात तांत्रिक आणि प्रक्रियात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन केलं जात आहे. तपास योग्य दिशेनं सुरू आहे. अपघातासंदर्भातील तर्क वितर्क टाळून प्रक्रिया नियमानुसार तपास करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती देखील AAIB कडून करण्यात आली आहे.

Ajit Pawar Plane Crash
Rohit Pawar Press Conference: झिरवाळ प्रकरणात सगळे शांत... त्यातच रोहित पवारांनी विलिनीकरणाबाबतची पत्रकार परिषद पुन्हा पुढं ढकलली

त्या देशाच्या नावाचा उल्लेख नाही

पुढारी न्यूजचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ज्यावेळेला एक्सिडेंट झालेला होता विमानाचा त्यानंतर तात्काळ हे सगळं प्रकरण एआयबी कडे देण्यात आलेलं होतं. एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो (AAIB) आणि त्यांच्या वतीने हे स्पष्टीकरण देण्यात आलेल आहे की त्या फ्लाईट मध्ये दोन स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर होते आणि ते दोन्ही दोन्ही रेकॉर्डर जे आहेत ते तीव्र उष्णतेच्या संपर्कात आले त्यामुळं त्यांच मोठं नुकसान झालं होतं.

AAIB ने पुढे सांगितलं की, ज्यावेळेला विमानाचा विमान लँडिंग करताना जो ब्लास्ट झाला होता त्यानंतर मोठी आग लागलेली लागलेली होती घटनास्थळावर आणि त्यावेळेमध्ये सगळं जळून खाक झालेलं होतं त्यानुसार दोन्ही फ्लाईट रेकॉर्डर हे तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे ते पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत पण दुसरी महत्त्वाची गोष्ट हीच आहे की एका लॅब मध्ये त्याचा जो डेटा होता तो रिकव्हर करण्यात यश आलं आहे.

आता जी काही त्याची माहिती आहे ती कलेक्ट करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी विशेष देशातून माहिती घेण्यात येत आहे. यावेळी तो देश कोणता याचा मात्र उल्लेख करण्यात आलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news