

मुंबई : पालिका निवडणुकांसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली. यादीत ८ मुस्लिम उमेदवार असून यात नबाव मलिक यांची बहीण, भाऊ आणि भावाची सून असे कुटुंबातील तीन उमेदवार आहेत, तर शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश करणारे धनंजय पिसाळ यांनाही संधी देण्यात आली आहे.
नवाब मलिक यांच्यामुळे भाजपने मुंबईत अजित पवार गटाबरोबर युती न करण्याचा निर्णय घेतला होता, तर नवाब मलिक यांच्याकडेच पक्षाची मुंबईची सूत्रे राहतील, अशी भूमिका अजित पवार गटाने घेतली होती.
मुंबई : वंचित बहुजन आघाडीने मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आपल्या दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुंबईत वंचित आघाडी आणि काँग्रेसने एकत्रित निवडणुका लढविण्याची घोषणा केली.
वंचित आघाडीला ६२ जागा सोडण्यात आल्या आहेत. यातील दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात राहुल ठोके (५४), गौतम हराल (१६०), स्वप्निल जवळगेकर (१६९), सिमा इंगीर (११४), सुनिता वीर (११८), चेतन अहिरे (११९), वर्षा थोरात (१२७), सतिश राजगुरू (१४६), ज्योती वाघमारे (१५५) आणि सुगंधा सोंडे (१७३) यांच्या नावांचा समावेश आहे.