

यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी व्हीएसआर ही विमान कंपनी तसेच ॲरो नावाची हॅन्डलर कंपनी यांची योग्य चौकशी व्हावी व त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी, सीआडी सारख्या संस्थांना तपास करण्यात मर्यादा येतात त्यामुळे विदेशी कंपनी व देशातंर्गत चांगली कंपनी यांच्या माध्यमातून या सर्व प्रकरणाचा तपास झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
पुढे रोहित पवार यांनी दादांसोबत झालेल्या संभाषणचा दाखला दिला ते म्हणालेकी माझ्या एका मित्राने हेलिकॉप्टर घेतले आहे. तेव्हा दांदांनी प्रश्न केला होता की तो तूझ्या विश्वासातला आहे का असेल तर तू त्याचाच हेलिकॉप्टरमधून दौरे करत जा. बाहेरुन तू घेत जाऊ नकोस आम्हाला वेगळेच काहीतरी ऐकायला मिळत आहे असे ते मला का म्हणाले असतील असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच दादांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना विमान घ्यायचा सल्ला दिला होतो. ते विमान मला वापरता येईल असे दादा म्हणाले होते. असा दावा रोहित पवार यांनी केला. पाण्याची बाटली बदलन्यापासून विमान घेण्याचा सल्ला दादांनी का दिला यामुळे महाराष्ट्राला अनेक प्रश्न पडले आहेत. असे सवाल रोहित पवार यांनी मांडले.
रोहित पवार यांनी एका गोष्टीवर प्रकाश टाकला की, आपला घातपात होणार आहे हे दादांना काही महिन्यांपूर्वी लक्षात आले होत का, यासाठी त्यांनी एक गोष्ट करुन दाखली ती म्हणजे प्लास्टिक बाटलीत इंजेक्शन टोचता येते. त्यामुळे गेल्या काही महिन्यात दादांनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर प्लास्टिक बाटलीतून पाणी पिणे बंद केले होते. ते आता काचेची बाटली वापरत होते, त्यांचे काही व्हिडीओ दिसतात की त्यांचा विश्वासू माणूस ती काचेची बाटली त्यांना पाणी पिण्यासाठी देत असतं मग हा प्रश्न समोर येतो की दादा पाणि पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीवरून काचेच्या बाटलीवर का आले, त्यांना आपले काही बेर वाईट होऊ शकतो याचा अंदाज आला होता का?
स्थानिक लोकांनी सांगितले की दररोज येथे विमाने उतरतात त्यांचा आवाज वेगळा असतो. पण दादांच्या विमानाचा आवाज वेगळाच आला. तर रोहित पवार म्हणाले की ब्लॅक बॉक्समध्ये पायलटचा संपूर्ण आवाज रेकॉर्ड होता. तो शिंकला तरी त्याचा आवाज रेकॉर्ड होतो पण या पीपीटी मध्ये पायलटचा कोणताही आवाज येत नाही. हे कसे शक्य आहे. तुमचा ॲक्सीडंट होत असल्याचे दिसत असेल तर तुम्ही किंचाळणार, ओरडणार, दादांचे विमान पडत होते त्यावेळी को पायलट शांभवी पाठक म्हणाल्या ओ शिट ओ शिट, पण या पूर्ण घटनाक्रमात मुख्य पायलट एकही शब्द कसा बोलला नाही ? पायलट झोपला होता का, दुसरे काय करत होता, की त्याच्या मनात एकच निश्चय होता या विमानाचा ॲक्सिडंटच घडवायचा होता? यामुळेच तो अजिबात बोलला नाही का असा प्रश्न तयार होत आहे.
बारामती विमानतळाचा 11 नंबर धावपट्टी टेबल टॉप म्हणजे उंच आहे त्या ठिकाणी विमान उतरवणे अवघड असते पण 29 नंबर वर धावपट्टीची बाजू सपाट आहे त्याठिकाणी लॅडिंग सोपे असते पण तो निर्णय का घेतला नाही. तसेच वाऱ्याचा वेगपण कमी होता. तसेच 29 नंबर धावपट्टीची परवानगी घेतली होती. पण ऐनवेळी 11 धावपट्टीची मागणी करण्यात आली असे का, हे काम को पायलट करत नाही तर मुख्य पायलट घेत असतो. हे का करण्यात आले. असा प्रश्न पडतो.
पुढे रोहित पवार यांनी सांगितले की आम्हाला कळाले की कपूर हा पायलट हाँगकाँग येथून आदल्या दिवशीच फ्लाईटने आला होता. जर इंटरनॅशनल फ्लाइटमध्ये दारु दिली जात असेल तर कपूर हा दारु पिऊन दादांचे विमान चालवायला आला होता का, त्याची ब्रेथ ॲनलाइजर टेस्ट केली होती का, असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच कपूर यांच्या परिवारला हे वाईट वाटेल पण प्रश्न विचारण्याचा आम्हाला हक्क् आहे आम्ही आमचा माणूस गमावला आहे. तुम्हीही तुमचा माणूस गमावला आहे.
पुढे मध्यरात्री साडेबारा वाजता उड्डाणासाठी विमान तयार झाला असा निरोप आला होता. सकाळी सात वाजता विमान तयार आहे असा व्हाटसअप वर मेसेज आला. त्यानंतर जे ठरलेले पायलट होते ते ट्रॅफिकमध्ये अडकले असे कळवण्यात आले मण हे कपूर व पाठक या दोघांची ऐनवेळी पायलट म्हणून नेमणूक झाली. हे दोघे का विमानतळावर राहयला होते का असा प्रश्न त्यांनी विचारला. ते दोघे ट्रॅफीकमध्ये अडकले असे म्हणतात तर मग त्यांचा सीडीआर काढला आहे का, तर त्यांचे लोकेशन कुठे होते हे कळाले असते. संबधित पायलटचे ब्रेथ ॲनलायझर केले का, याचे सीसीटीव्ही आहेत का, विमानात काय ठेवले आहे का याची तपासणी झाली होती का असे बरेच प्रश्न निर्माण होतात
विमान कोण चालवणार होते याची माहीती एका इमेलमध्ये आहेत. कॅप्टन साहिल मदन व कॅप्टन यश , तसेच प्रवासाची माहिती या जुन्या इमेलमध्ये आहेत. पण दुसऱ्या दिवशी ही नावे बदलण्यात आली होती. या दोघांची नावे उड्डाणासाठी पायलट म्हणून होती मग त्यांनतर पाठक व कपूर यांची नावे फिक्स झाली हे कोणी केले. तसेच कपूर चा एक मित्र आहे की तो या अपघातापूर्वी भारताच्या बाहेरुन आला होता तो दादांचे विमान उडवणार नव्हता पण त्याला हे काम करण्यास कोणी भाग पाडले. त्यामुळे आम्ही प्रश्न विचारतो की विमानाचे पायलट ऐनवेळी का बदलण्यात आले
दादा विमान प्रवासा कोणतीही रिस्क कधी घेत नव्हते, उपमुख्यमंत्री कडक होते ते पायलटवर दबाव टाकला असेल असेही काही लोक म्हणतात पण त्याचे स्टेटमेंट बघा, विमान उडवत असताना ते कॅप्टनला पूर्ण अधिकार देत होते. याचा दाखला देताना रोहित पवार यांनी दोन वर्षापूर्वीची घटना सांगितली. दादा एका कार्यक्रमाला लोणावळ्याला हेलिकॉप्टरने येत होते त्यावेळी पायलट म्हणला धूक थोड जास्त आहे पण काळजी करुन नका हेलिकॉप्टरला 2 इंजिन आहेत. पण दादांनी त्या पायलटला स्पष्ट शब्दात हेलिकॉप्टर उतरवू दिले नाही परत मुंबईला घे असे म्हणले. मुंबईत हेलिकॉप्टर परत गेले व दादा गाडीने लोणावळयाला आले. ही वस्ततिथी जो एस्कपर्ट आहेत त्यांचे ऐका असे म्हणायचे पण या घटनेत असे का झाले नाही हे पहावे लागेल.
पूर्व विदर्भातील एक मोठे नेते भेटीला येणार होते पण त्यांना वेळ झाला त्यामुळे त्यांनी गाडीने जाण्याचे कॅन्सल केले व दुसऱ्या दिवशी विमान बुक केले हे का घडले, त्या नेत्यांना ज्या फाईलवर सही करायची होती ती मंत्रालयात होती. ती मागवून घेण्यात वेळ गेला . या सर्व घडामोडींनंतर दादांनी कारने जाण्याचे कॅन्सल झाले व दुसऱ्या दिवसाचे विमान बुक केले. या सर्व घटना घडायच्या आदल्या दिवशीच्या घडामोडी आहेत. याचा विचार होणे गरजेचे आहे.
दादांच्या विमानाचा अपघात घडवून आणला असेल, याबाबत मला शंका आहे एका सुरक्षा क्षेत्रात काम करणारा माणूस मला भेटला. त्याने एक पुस्तक दिले त्यामध्ये मोसाद या इस्त्रायलच्या एजन्सीचा कार्यपद्धती सांगितले आहे. त्यात सांगितले आहे की कोणत्याही व्यक्तिला मारण्यापूर्वी त्याच्या चालकाला मारावे लागते. जर ती व्यक्ति कारमध्ये असेल तर कारच्या चालकाला जर व्यक्ति विमानात असेल तर पायलटला मारले जाते असे त्यांनी उदाहरण दिले. तसेच घातपात आहे का याची राज्यभरात चर्चा आहे, या घटनेत महाराष्ट्राचा नेता गेला आहे त्यामुळे मला याची शंका येत आहे असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
या व्हिसीआर कंपनी वादग्रस्त आहेत. त्यांच्या विमांनाची योग्य तपासणी केली जाते का. तांत्रीक बाबी तपासल्या जातात का, त्याचबरोबर डीजीसीआय या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संबधित विमानाची तपासणी केली होती आदी प्रश्न पवार यांनी उपस्थित केले.
या विमानाचा 2023 मध्ये संबधित विमानाचा अपघात झाला होता. त्यावेळी डीसीजीआयने या अपघाताची चौकशी केली नाही. तसेच या विमानाच्या या अपघाताची चौकाशी योग पद्धतीने झाली नाही असा आरोप पवार यांनी केला. दबाव वाढल्यानंतर डीसीजीआयने याची चौकशी गेल्यावर्षी देण्याचा शब्द दिला होता.
विमानाचे मालक म्हणतात व त्यांनी तसे स्टेटमेट दिले आहे पण स्थानिक लोक म्हणताता येथून हजारो विमाने जातात पण अजितदादांचे विमानाचा ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी त्याविमानाचा आवाज वेगळा होता. त्यामुळे या विमानाचा खरोखरच मेटेनन्स झाला होता का प्रश्न पडत आहे.
दादा गेले त्यावेळी 9 वाजले होते त्यांच्या मृत्यूची बातमी 9.45 ला आली होती. हे विमान कुठे फिरून आले होते ते सुरत व अहमदाबादला जाऊन आले होते. दादांच्या बंद पडलेल्या घड्याळात 9 वाजले होते.