

नवी मुंबई : ऐरोली नॉलेज पार्क परिसरात नवी मुंबई महानगरपालिकेने पाच वर्षांपूर्वी 58 कोटी रुपये खर्च करून रस्त्यांचे सिमेंटीकरण तसेच पादचारी पूल बांधला आहे. या पुलावर उद्वाहक देखील बसवण्यात आला आहे. मात्र हा पूल प्रवाशांसाठी खुला झाल्यापासून येथील उद्वाहक बंद अवस्थेतच आहे.
या पुलाला वीजपुरवठा नसल्यामुळे सायंकाळनंतर हा पुलावर संपूर्ण काळोख असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी हा पादचारी पूल मद्यपींचा अड्डा बनतो. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला असून या पादचारी पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
ऐरोली नॉलेज पार्क परिसरात कॅपेजीमिनी, अॅक्सिस बॅक, मांईडस्पेस यांसारख्या आयटी कंपन्या आहेत. या कंपन्यामध्ये हजारोंच्या संख्येने कर्मचारी आहेत. त्यामुळे या परिसरात पादचार्यांसह वाहनचालकांची मोठी वर्दळ असते. येथे येणार्या कर्मचार्यांना पूर्व-पश्चिम ये-जा करण्यासाठी पादचारी पूल उभारण्यात आला आहे. मात्र दुरवस्थेमुळे या पादचारी पुलाचा वापर करण्यात येत नाही.
ऐरोली नॉलेज पार्क परिसरात असलेल्या या पादचारी पुलाची माहापालिकेकडून पाहणी करण्यात येईल. पुलाची दयनीय अवस्था झाली असल्यास त्याची दुरुस्ती करण्यात येईल.
शिरीष आरदवाड, शहर अभियंता, नमुंमपा