Air pollution raises heart disease and diabetes risk- वायुप्रदूषणामुळे हृदयविकार, मधुमेहाचा धोका वाढला

Air pollution raises heart disease and diabetes risk-वायुप्रदूषणामुळे हृदयविकार, मधुमेहाचा धोका वाढला
Air pollution raises heart disease and diabetes risk
Air pollution raises heart disease and diabetes risk
Published on: 
Updated on: 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

वाहनांचा धूर, बांधकामांमधून निर्माण होणारी धूळ आणि औद्योगिक उत्सर्जनामुळे वाढणारे वायुप्रदूषण हे केवळ श्वसन विकारांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर हृदयविकार, उच्च खत्तदाब, मधुमेह, गर्भधारणेतील गुंतागुंत आणि मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासावरही त्याचे गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. देशभरातील १८४ वैद्यकीय, महामारी शास्त्रीय अभ्यासांच्या आढाव्यातून ही बाध स्पष्ट झाली आहे.

सुमारे पाच दशकातील संशोधनाचा आढावा घेतल्यानंतर १८४ पैकी १६१ अभ्यासांमध्ये वायुप्रदूषणाचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे आढळले. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड वलीन एअर (सीआरईए) या संस्थथेने हा अहवाल प्रसिद्ध केला. १९७५ ते मार्च २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या संशोधनाचा यात समावेश आहे.

श्वसनविकारांशी संबंधित ८६ अभ्यासांपैकी ८१ अभ्यासांमध्ये वायुप्रदूषणाचा आणि आरोग्याच्या समस्यांचा थेट संबंध आढळला. हृदव व स्वत्त वाहिन्यांच्या आजारांवरील ११ अभ्यासपैिकी १० अभ्यारांनी वायुप्रदूषणाचे प्रतिकूल परिणाम अधोरेखित केले. मृत्युदराचा अभ्यास करणाऱ्या सर्व १६ संशोधनांमध्येही वायुप्रदूषणाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले. या अभ्यासात १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. याशिवाय राष्ट्रीय स्तरावरील आणि अनेक राज्यांमध्ये केलेल्या संशोधनाचाही आढावा घेण्यात आला.

पंजाबमध्ये १३, महाराष्ट्रात ११, उत्तर प्रदेशात ११, पश्चिम बंगालमध्ये १०, तामिळनाडूमध्ये ९, कर्नाटकमध्ये ८ आणि तेलंगणामध्ये ७ अभ्यास करण्यात आले. विशेष म्हणजे, ग्रामीण लोकसंख्येवर आधारित ४० अभ्यासांपैकी ३८ अभ्यासांमध्ये वायुप्रदूषणाचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे आढळले.

सरकारी निधीतून करण्यात आलेल्या ४६ अभ्यासांपैकी ४४ अभ्यासांमध्ये वायुप्रदूषणाचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे आढळले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, एम्स तसेच पर्यावरण आणि आरोग्य मंत्रालयांशी संबंधित संशोधनांचाही या आढाव्यात समावेश आहे.

या निष्कर्षामुळे वायुप्रदूषण नियंत्रणासाठी केवळ शहरांवर लक्ष केंद्रित करून चालणार नाही, तर ग्रामीण भागावाही समावेश करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वाच्छ हवा कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात प्रादेशिक स्तरावर आणि 'एअरशेड' आधारित नियोजनाला प्राधान्य देण्याची गरज आहे.

- मनोज कुमार, सीआरईएचे विश्लेषक

कणांचा वाटा सुमारे एक चतुर्थांश

या संशोधनात पीएम २.५ आणि पीएम १० या सूक्ष्म धूलिकणांव्यतिरिक्त नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, ओझोन, कार्बन मोनॉक्साइड, ब्लॅक कार्बन, ऑरगॅनिक कार्बन आणि जड धातूंचाही अभ्यास करण्यात आला

सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड यांच्यात वातावरणात रासायनिक प्रक्रिया होऊन सल्फेट आणि नायट्रेटचे कण तयार होतात, हे करण दुय्यम पीएम २.७ प्रदूषणाला कारणीभूत ठरतात. देशातील एकूण पीएम २.५ प्रदूषणात अशा कणांचा वाटा सुमारे एक चतुर्थांश असल्याचे सीआरईएच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वायुप्रदूषणाचा विविध अवयवांवर होणारा परिणाम

फुफ्फुसे: वायुप्रदूषणामुळे दम्याचे झटके आणि ब्राँकायटिसचा आस वाढतो. फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. दीर्घकाळ प्रदूषित हवेत राहिल्यास सीओपीडी आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका बाडू शकतो.

हृदय : हवेतील अतिसूक्ष्म प्रदूषक कण रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊन उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.

मेंदू : वायुप्रदूषणामुळे मेंदूतील दाह, आकलन क्षमतेत घट आणि मुलांच्या मज्जासंस्थेच्या विकासात अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच स्मृतिभ्रंश आणि अल्झायमच्या आजाराशीही त्याचा संबंध आढळला आहे.

मूत्रपिंड आणि यकृत : शरीरातील विषारी घटक गाळून बाहेर टाकण्याचे काम करणाऱ्या या अवयवांवर प्रदूषणामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होऊ शकतो. परिणामी दीर्घकालीन नुकसान होण्याची शक्यता असते.

प्रजनन आरोग्य : गर्भवती महिलांना प्रदूषणाचा अधिक संपर्क आल्यास बाळाचे जन्मतः वजन कमी असणे आणि मुदतपूर्व प्रसूती होण्याचा धोका वाढतो. पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही प्रदूषणाचा परिणाम होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.