Ahmedabad Plane Crash | अहमदाबाद विमान अपघात: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोकसंवेदना

Devendra Fadnavis | महाराष्ट्राची जनता दुःखात सहभागी, मदतीसाठी सर्व यंत्रणाना सज्जतेचे निर्देश
Devendra Fadnavis  Reaction to Ahmedabad Plane Crash
Devendra Fadnavis (Pudhari Photo)
Published on
Updated on

Devendra Fadnavis Reaction to Ahmedabad Plane Crash

मुंबई: अहमदाबाद-लंडन विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातातील मृत आणि नातेवाईंकांप्रती संवेदना प्रकट केली आहे. अनेकांनी आपल्या घरातील कर्ते आणि जीवलग गमावले आहेत. काळाने घातलेली ही झडप अनेक कुटुंबियांसाठी शब्दांच्या पलिकडली आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. या सगळ्यांच्या दुःखात आम्ही सर्व, महाराष्ट्राची जनता सहभागी आहे. त्यांना या दुःखद आघातातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वचरणी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणतात, अहमदाबाद-लंडन या विमानाची झेप ही अनेकांसाठी अंतिम ठरली. रहिवासी परिसरात हा अपघात झाल्याने या अपघाताची भीषणता आणखी वाढली. या अपघाताने देश दुःखात बुडला असून, विमानातील प्रवाशी, विमानातील अधिकारी-कर्मचारी, अपघातग्रस्त परिसरातील नागरिक यांच्या कुटुंबियांच्या दुःखाला पारावर राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या अपघाताची गांभीर्याने दखल घेऊन, तातडीने संबंधित यंत्रणांना निर्देशित केले आहे.

Devendra Fadnavis  Reaction to Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane Crash | एअर इंडियाचा सोशल मीडियावर 'ब्लॅकआऊट'; अहमदाबाद विमान अपघातानंतर प्रोफाइल पिक्चर बदलले

या कठीण प्रसंगात महाराष्ट्रातील नागरिक, आमच्या सर्व यंत्रणा गुजरातमधील शासन-प्रशासनासोबत ठामपणे उभे आहोत. या आपत्तीच्या काळात अपघातग्रस्त परिसरासह, प्रवाशी आणि जखमींसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत सक्रीय सहभाग देण्यात येत आहे. अपघातातील जखमींना चांगले उपचार मिळावेत यासाठी तसेच संबंधितांच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी यंत्रणांना निर्देशित करण्यात आले आहे. वाहतुकीच्या सुविधांसाठी, वैद्यकीय उपचार आणि अनुषंगिक उपाययोजनांबाबत सज्जता ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असेही मुख्यमंत्र्यानी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news