ॲड. असीम सरोदे यांनी कायदेशीर मदत करावी; उरण येथील यशश्री शिंदेंच्या कुटुंबाची मागणी

Yashshri Shinde murder case | ॲड. सरोदे यांची कायदेशीर मदतीची तयारी
Yashshri Shinde murder case Dawood Shaikh
ॲड. असीम सरोदे यांनी कायदेशीर मदत करण्याची मागणी उरण येथील यशश्री शिंदेंच्या कुटुंबाने केली आहे. (Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उरण येथील यशश्री शिंदे हिच्या निर्घृण खून प्रकरणात कायदेतज्ज्ञ, ॲड. असीम सरोदे यांनी कायदेशीर मदत करावी, अशी पत्राद्वारे मागणी यशश्रीच्या अन्यायग्रस्त कुटुंबीयांनी केली आहे. यावर मी व आमची लॉ टीम यशश्री शिंदे हिच्या कुटुंबियांना कायदेशीर मदत व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घ्यायला तयार आहोत, असे ॲड. सरोदे यांनी म्हटले आहे. (Yashshri Shinde murder case)

या पत्रात म्हटले आहे की, उरणमध्ये आमच्या मुलीची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या झाली. अनेक राजकीय नेते भेट देऊन गेले. काहीजणांनी येथे प्रक्षोभक भाषणे केली. परंतु, तुम्ही आलात तेव्हा वेगळेपण जाणवले की, आम्हाला खरोखर मदत करण्याचा तुमचा उद्देश आहे. तुमच्या बोलण्यातील संतुलितपणा व साधेपणा बघून आम्हाला विश्वास आहे की, सम्यक-न्यायाच्या दिशेने तुम्ही काम करता. त्यामुळे तुम्ही व तुमची लॉ टीम ॲड. सिद्धार्थ इंगळे, ॲड. श्रीया आवळे, ॲड. बाळकृष्ण निढाळकर यांनी आमची केस घ्यावी आणि आम्हाला सगळी कायदेशीर मदत करावी, अशी आमच्या कुटुंबाची इच्छा आहे. (Yashshri Shinde murder case)

ही आमच्या कामाची पावती : ॲड. असीम सरोदे

मी व आमची लॉ टीम यशश्री शिंदे हिच्या कुटुंबियांना कायदेशीर मदत व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घ्यायला तयार आहोत. त्यांनी आमच्यावर विश्वास दाखविला ही आमच्या कामाची पावती आहे, असे ॲड. असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

यशश्री मैत्रिणीकडे जाते, असे सांगून गेली ती परतलीच नाही...

२५ जुलैला यशश्री मैत्रिणीकडे जाते, असे सांगून घरातून निघाली होती; पण रात्री उशीर होऊनही ती परतलेली नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह आढळून आला. यशश्री बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. त्यावेळी यशश्रीच्या कॉल रेकॉर्डस्वरून एका नंबरवर तिचे सातत्याने बोलणे होत असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी तपासाची दिशा त्यानुसार वळवली आणि दाऊदला बेड्या ठोकल्या होत्या. हत्येनंतर मारेकरी कर्नाटकात त्याच्या मूळ गावी पसार झाला होता.

Yashshri Shinde murder case Dawood Shaikh
Yashshri Shinde murder case | यशश्री शिंदे हत्या प्रकरण : आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news