दुग्धजन्य पदार्थांत भेसळ केल्यास ‘मोका’अंतर्गत कारवाई होणार

Maharashtra Budget Session | कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव : उपमुख्यमंत्री अजित पवार
dairy product
दुग्धजन्य पदार्थांत भेसळ केल्यास ‘मोका’अंतर्गत कारवाई होणारFile Photo
Published on
Updated on

मुंबई ः दूध, पनीर आणि तत्सम अन्नपदार्थांत होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. हे खपवून घेतले जाणार नाही. दूध आणि तत्सम अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणार्‍यांवर मोका कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील. त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले.

अ‍ॅनालॉग चीज हा पदार्थ राज्यात अनेक ठिकाणी अ‍ॅनालॉग पनीर या नावाने विक्री होत असल्याबाबत, तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे उघडकीस आलेल्या बनावट पनीरच्या संदर्भात आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर झालेल्या चर्चेच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील समिती कक्षात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक विभागात एक प्रयोगशाळा सुरू करा

दुधातील भेसळ तपासण्यासाठी तातडीने प्रत्येक विभागात एक प्रयोगशाळा सुरू करावी, पनीर मध्ये अ‍ॅनालॉग चीज असल्यास त्यासंबंधीची माहिती दुकानात लावण्यासंदर्भात सूचना द्याव्यात. दूध भेसळीसंदर्भात जनजागृती करण्यात यावी, भेसळीसंदर्भात जनतेला तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक योग्य प्रकारे कार्यान्वित करावा, पोर्टल विकसित करावे असे निर्देश अजित पवार यांनी दिले.

तंत्रज्ञानासाठी आणखी निधी देणार

दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये आणखी निधी देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अन्न व औषध प्रशासन विभागातील अपुर्‍या मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी डेअरी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांची सेवा घेण्यात यावी, त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे असे त्यांनी सांगितले. सोलापूर दूधभेसळ प्रकरणातील आरोपी कोणीही, कोणत्याही पक्षाचे व कितीही मोठे असतील तरी त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news