

पुढारी ऑनलाईन डेस्क : वरळीचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज (दि.९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मिल कामगारांच्या प्रश्नासंदर्भात बैठक घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. होर्डिंग मुळे शहरे बकाल होत आहेत, त्यावरही कारवाई करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. (Aditya Thackeray meet Devendra Fadnavis)
ते पुढे म्हणाले की, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या. तर आम्ही देखील कौतुक करु. दावोसप्रकरणी आधी जी उधळपट्टी झाली, ती होऊ नये,अशी आमची मागणी आहे. गृहनिर्माण संस्थांसाठी पॉलिसी महत्त्वाची आहे. निवृत्त दंडणी शुल्क लावला आहे, तो वाढला असून तो परवडणारा नाही. पोलिसांच्या दोन तीन पिढ्यांनी सेवा केलेली कुटुंब आहेत. निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मुंबईतच घरे द्यावी, ही मागणी होती. पोलिस इमारती दुरुस्तीला आलेल्या आहेत. त्यांची दुरूस्ती करावी. मुंबईत घरे कशी मिळतील, यासंदर्भात अंमलबजावणी व्हावी, असे ठाकरे म्हणाले. (Aditya Thackeray meet Devendra Fadnavis)
आमच्या सरकारच्या काळात आम्ही सर्वांसाठी पाणी योजना आणली होती. गृहनिर्माण, झोपडपट्टी न पाहता सर्वांना पाणी देणे गरजेचे आहे. टोरेस घोटाळा प्रकरणी कारवाई करावी, अशीही मागणी ठाकरे यांनी यावेळी केली.