दहा कोटीच्या एमडीसह आरोपीस अटक

पाच किलो एमडी जप्त; एनसीबीची कारवाई
Accused arrested with MD worth ten crores
दहा कोटीच्या एमडीसह आरोपीस अटकfile photo

सुमारे दहा कोटी रुपयांच्या दोन किलो एमडीसह एम. एस खान नावाच्या एका आरोपीस शीव येथून नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी अटक केली. खान हा आंतरराज्य ड्रग्ज तस्करीत सक्रिय असल्याचे तपासात उघडकीस आले असून त्याने हैद्राबाद येथून एमडी ड्रग्ज आणला होता. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने एनसीबी कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून त्याच्या इतर सहकार्‍यांचे नाव समोर आले असून त्यांचा एनसीबीचे अधिकारी शोध घेत आहेत.

Accused arrested with MD worth ten crores
एमडी ड्रग्ज रॅकेटच्या मुख्य 'मास्टरमाईंड' जाळ्यात

मुंबई शहरात एमडी ड्रग्ज तस्करी करणार्‍या एक आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीवरुन या अधिकार्‍यांनी या टोळीची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. यावेळी अंधेरी येथे राहणार्‍या एम. एस खान याचे नाव समोर आले होते. तो शीव येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून एम. एस खान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत या अधिकार्‍यांना पाच किलो वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात दहा कोटी रुपये इतकी किंमत आहे.

Accused arrested with MD worth ten crores
पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलिसांचे महत्त्वपूर्ण पाऊल

तपासात खान हा एमडी ड्रग्ज तस्करीच्या आंतरराज्य टोळीचा सदस्य असल्याचे उघडकीस आले. त्याने ते एमडी ड्रग्ज हैद्राबाद येथून आणले होते. त्याची तो मुंबईत विक्री करणार होता. ते ड्रग्ज तो कोणाला देणार होता, याकामी त्याला किती रुपयांचे कमिशन मिळणार होते, त्यापूर्वीही एमडी ड्रग्जची खरेदी-विक्री केली आहे याचा एनसीबीचे अधिकारी तपास करत आहेत. त्याच्या चौकशीतून इतर काही सहकार्‍यांचे नाव समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news