MSRTC Campaign : ‌‘आपली बस, आपली सेवा‌’ 1 मे पासून ST चे अभियान : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

प्रवासादरम्यान मदतीचा हात पुढे करणारा चालक-वाहक हा एसटीचा खरा चेहरा ठरेल.
MSRTC Campaign : ‌‘आपली बस, आपली सेवा‌’ 1 मे पासून ST चे अभियान : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‌‘आपली बस, आपली सेवा‌‘ या व्यापक अभियानाच्या माध्यमातून प्रवासी सेवेत सुधारणा करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

एसटी बसेसची संख्या वाढत असली तरी प्रवासी संख्या आणि महसूल अपेक्षेप्रमाणे वाढत नसल्याने प्रवाशांचा विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी सेवेत सुधारणा करण्यात येणार आहे. 1 मे 2026 पासून या अभियानांतर्गत चालक आणि वाहक हे केवळ कर्मचारी न राहता ‌‘सेवक‌’ बनणार आहेत. बस ताफ्यात समाविष्ट करण्यापूर्वी तिची स्वच्छता, वेळेआधी फलाटावर उपस्थिती, नीटनेटका गणवेश आणि शिस्तबद्ध वर्तन यांना आता केवळ नियमांची चौकट नसून सेवाभावाची ओळख मानली जाणार आहे.

बस सुटण्यापूर्वी चालकाने स्वतःची ओळख करून देत प्रवाशांना प्रवासाचा मार्ग, थांबे आणि अपेक्षित वेळ याची माहिती देणे हा केवळ औपचारिक भाग नसून प्रवाशांशी नातं जोडण्याचा एक सुसंवादी प्रयत्न असेल. प्रवासादरम्यान मदतीचा हात पुढे करणारा चालक-वाहक हा एसटीचा खरा चेहरा ठरेल. एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी परिपत्रक जारी केले आहे.

स्वच्छता राखणे, मौल्यवान वस्तूंची जबाबदारी स्वतः घेणे, तसेच मोठे साहित्य योग्य ठिकाणी ठेवणे यामध्ये प्रवाशांचा सहभाग अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच एनसीएमसी स्मार्ट कार्डचा वापर आणि ऑनलाईन आरक्षण सुविधा देण्यात आली आहे. बस रद्द होणे किंवा मार्गात अडथळे निर्माण होणे या परिस्थितींमध्ये प्रवाशांना तत्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बसस्थानके आणि परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज ठेवण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news