

मुंबई : मुंबईकरांना घराजवळ प्राथमिक सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या आपला दवाखान्याने एका खासगी डायग्नोस्टिक लॅबशी करार केला असून त्याअंतर्गत आता रुग्णांची एक्स-रे, ईसीजी, सोनोग्राफी, सीटी स्कॅन आणि एमआरआय तपासणी पालिकेच्या दराने खासगी लॅबमध्ये होणार आहे.
पालिकेची रूग्णालये असो की शासकीय रुग्णालय मुंबईकरांना वैद्यकीय तपासणीसाठी तासन्तास वाट पाहावी लागते, तर एमआरआयसाठी दोन महिने, सीटी स्कॅन, सोनोग्राफीसाठी महिनाभर वेटिंग असते. खासगी रुग्णालयाचे दर परवडत नसल्याने वाट पाहावी लागते. त्यातून आता मुंबईकरांची सुटका होईल. एखाद्या रुग्णाला चाचणीची गरज आहे असे वाटत असेल तरच त्या चाचण्या कागदावर लिहन ज्यांच्याशी करार केला आहे त्या चाचणी केंद्रांकडे पाठवू. रुग्णाला पालिका दवाखान्यातून रेफर केलेला रुग्ण असल्याची खात्री करण्यासाठी त्याला एक कूपन देण्यात येणार अहे.
आपला दवाखान्याचे आणि पॉलीक्लिनिकचे डॉक्टर आता एक्स-रे, ईसीजी, सोनोग्राफी, सीटी स्कॅन आणि एमआरआयसारख्या योग्य चाचण्यांसाठी त्यांना जवळच्या खासगी चाचणी केंद्रात पाठवत आहेत. पालिकेने दर महिन्याला दवाखान्यातून निर्धारित केल्या जाणाऱ्या चाचण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला असून ही प्रणाली पारदर्शक राहण्यास मदत होईल. केवळ वरिष्ठ डॉक्टर आणि पॉलीक्लिनिकचे विशेषज्ञ एमआरआय आणि सीटी स्कॅनसारख्या प्रमुख चाचण्या लिहून देऊ शकतात. यामुळे रुग्णांना आर्थिक मदत तर होईलच, पण वेळेवर निदान आणि उपचारासाठीही मदत होईल सर्व आपला दवाखाना खासगी केंद्रांशी जोडलेले आहेत.
ईसीजी २० रुपये
एक्स-रे ३० रुपये
सोनोग्राफी ५० रुपये
सीटी स्कॅन १२०० रुपये
एमआरआय २५०० रुपये