Free diagnostic tests
आपला दवाखान्यात 83 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्याpudhari photo

Free diagnostic tests : आपला दवाखान्यात 83 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या

महापालिकेची फेरनिविदा, महिनाभरात सुविधा उपलब्ध होणार
Published on
मुंबई : राजेश सावंत

मुंबई महानगरपालिच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रात (आपला दवाखाना) विविध आजाराच्या 83 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. अगोदरच्या निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने काही बदल करून फेरनिविदा काढल्या आहेत. यात प्रगत चाचण्यांचाही समावेश केला आहे.

यासाठी पालिकेला चार वर्षात सुमारे 102 कोटी रुपये खर्च येणार आहे. महिनाभरात ही सुविधा उपलब्ध होईल असे आरोग्य विभागाचे म्हणणे असून यामुळे गोरगरीब रुग्णांची गैरसाय दूर होणार आहे.

यापूर्वीही महापालिकेन वैद्यकीय चाचण्यांसाठी निविदा प्रक्रियाही राबवली होती. मात्र पालिकेच्या काही हॉस्पिटल, प्रसुतीगृह व दवाखान्यात करण्यात येणार्‍या चाचण्यांचा दर कमी असून त्या मर्यादित आजारासाठी केल्या जातात. त्यामुळे निविदा प्रक्रिया राबवूनही प्रतिसाद मिळाला नाही. आता वैद्यकीय चाचण्यांचे तीन गट तयार करून निविदा मागवण्यात येणार आहेत. यात मूलभूत चाचण्या ए गट, मूलभूत रक्त चाचण्या बी गट, व विशेष प्रगत रक्त चाचण्यांंकरिता एक स्वतंत्र गट तयार करण्यात आला आहे. चार वर्षात 17 लाख 70 हजार चाचण्या होतील असे अपेक्षित धरून, 102 कोटी 86 लाख 40 हजार रुपये खर्च येणार असल्याचे अंदाजपत्र तयार करण्यात आले आहे.

सतरा प्रकराच्या प्रगत चाचण्या

आपला दवाखान्यात विविध आजाराच्या 83 चाचण्या होणार आहेत. यात 43 प्रकराच्या मूलभूत रक्त चाचण्या, 23 प्रकराच्या मूलभूत रक्त चाचणी बी तर 17 प्रकारच्या प्रगत रक्त चाचण्यांचा समावेश आहे.

आपली चिकित्सा’ अंतर्गतही मोफत चाचण्या

महापालिकेची प्रमुख हॉस्पिटल, दवाखाने व प्रसुतिगृहांमध्ये सध्या आपली चिकित्सा’ या योजनेअंतर्गत चार वर्षांपासून बहिस्त्रोत्र पद्धतीने रक्तचाचण्या करण्यात येत आहेत. 2 फेब्रुवारी 2027 पर्यंत हे कंत्राट आहे. मात्र यात चाचण्यांची संख्या मर्यादित आहे.

चाचण्यांचा दरही वाढला

मुंबई महानगरपालिका आपली चिकित्सा अंतर्गत करण्यात येणार्‍या रक्त तपासणीसाठी 86 रुपये तर प्रगत चाचणीसाठी 344 रुपये मोजत आहे. पण आपला दवाखान्यामध्ये करण्यात येणार्‍या चाचण्यांचा दर सुमारे 14 रुपये ते 54 रुपये इतका जास्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news