
पुढारी ऑनलाईन डेस्क : सिनेअभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. काळवीट शिकारप्रकरणी सलमानने मंदिरात जाऊन माफी मागावी अथवा पाच कोटींची खंडणी द्यावी, अशी धमकी मंगळवारी सलमानला देण्यात आली होती.
मुंबई पोलिसांना धमकीचा मेल प्राप्त झाल्यानंतर याप्रकरणी चौकशी सुरू होती. सलमान याने माफी न मागितल्यास त्याची हत्या केली जाईल, असेही सोशल मीडियाद्वारे पाठविलेल्या धमकीपत्रात म्हटले होते. या प्रकरणात एका तरुणाला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. विक्रम असे या तरूणाचे नाव असल्याची प्राथमिक माहीत मिळत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.