गोरेगाव जवाहर नगर येथील चप्पल दुरुस्ती- विक्रीचे दुकान आगीत जळून खाक

या दुर्घटणेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
malad fire news
गोरेगाव जवाहर नगर येथील चप्पल दुरुस्ती- विक्रीचे दुकान आगीत जळून खाकfile photo
Published on
Updated on

A shoe repair and sales shop in Jawahar Nagar, Goregaon, was gutted in a fire

मालाड : पुढारी वृत्तसेवा गोरेगाव पश्चिम येथील जवाहर नगर रोड क्र. ११, प्लॉट क्र. २०० परिसरातील चप्पल दुरुस्ती व विक्री करणारे दुकान आज पहाटे लागलेल्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाले.

malad fire news
AI मुळे नोकऱ्या जातायत का? सॅम ऑल्टमन स्पष्टच बोलले; काही कंपन्या आधीच तयार होत्या!

या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रकाश एकनाथ जाधव यांचे चप्पल दुरुस्तीचे दुकान दिनांक २२ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत भस्मसात झाले. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक व गोरेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने आग आटोक्यात आणली.

malad fire news
Shraddha Kapoor Kolhapur |'ईठा'चे शूटिंग, श्रद्धा कपूर अंबाबाईच्या चरणी, चाहत्यांची प्रचंड गर्दी

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. मात्र आगीत प्रकाश जाधव यांचा स्टॉल तसेच विक्रीसाठी ठेवलेले चप्पल, बूट व इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून त्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेमुळे त्यांच्या समोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेची पुढील चौकशी गोरेगाव पोलीस ठाणे व अग्निशमन दलाचे अधिकारी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news