राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर चित्रपटाची निर्मिती व्हावी: सुधीर मुनगंटीवार

file photo
file photo
Published on
Updated on

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर चित्रपट निर्माण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सह्याद्री अतिथीगृहात आज (दि.१८) विविध कलाकारांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.

मंत्री मुनगंटीवार यांनी याविषयी अभिनेत्री अलका कुबल यांच्याशी चर्चा करून चित्रपटासंदर्भातील कल्पनांची देवाणघेवाण केली. हा चित्रपट दर्जाने उत्तम होण्यासाठी राज्य शासन योग्य ती मदत करेल, असेही यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले. पुढच्या वर्षी १४ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचे प्रकाशन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news