पुण्यातील एक नगरसेवकही बिश्नोई गँगच्या टारगेटवर

बाबा सिद्दिकींवर हल्‍ला प्रकरणातील संशयित आरोपीचा खुलासा
A corporator from Pune is also on the target of Bishnoi gang
पुण्यातील एक नगरसेवकही बिश्नोई गँगच्या टारगेटवर File Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार केलेला संशयित आरोपी शिवा ठाकूर याच्या टारगेटवर पुण्यातील एक नगरसेवक देखील असल्याची पोलीस तपासात माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावरती हल्ला करणाऱ्या शिवा ठाकूर याची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. या दरम्‍यान अनेक धक्‍कादायक बाबी समोर येत आहेत.

शिवा ठाकूर हा पुण्यामध्ये रद्दीच्या दुकानात अनेक महिने काम करत होता. याच दरम्यान शिवा याची ओळख शुभम लोणकर याच्याशी झाली व तो गुन्हेगारी जगताकडे वळला. शुभम लोणकरने शिवा याला आपण लॉरेन्स बिष्णोई गँगचे असल्याचे सांगितल्यानंतर त्याचा त्याच्यासोबत संपर्क वाढला व त्यानंतर त्याला या कटात सहभागी करून घेतला.

परंतु, आता बाबा सिद्दिकी आणि जिशान सिद्दिकी यांचा हत्येचा कट रचत असताना पुण्यातील एक नगरसेवक देखील बिश्नोई गँगच्या टारगेटवरती असल्याचे शिवा याने पोलिसांना सांगितले आहे. या धक्‍कादायक माहितीमुळे खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news