Molested Case | तेरा वर्षाच्या मुली मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग

कांदिवलीतील शाळेतील घटनेने संतापाची लाट
minor girl molested
तेरा वर्षाच्या मुली मुलीचा शिक्षकाकडून विनयभंगPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

तेरा वर्षांच्या मुलीशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कांदिवलीतील एका शाळेत उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

(Mumbai Molested Case)

minor girl molested
ब्रेकिंग! विधानसभांच्या निवडणुकांची आज घोषणा

कांदिवली परिसरात राहणारी ही मुलगी जवळच असलेल्या एका शाळेत शिकते. जुलै महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात शाळेत असताना तिच्याशी शाळेतील शिक्षकाने अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.

अलीकडेच तिने घडलेला प्रकार शाळेच्या मुख्याधापिकेला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पालकांच्या विनंतीनंतर मुख्याधापिकेने कांदिवली पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरुद्ध तक्रार केली.

minor girl molested
Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शुक्रवार, १६ ऑगस्‍ट २०२४

या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या शिक्षकाला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने शाळेतील शिक्षक, पालकासह विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news