Bandra Station stampede : वांद्रे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 9 प्रवासी जखमी

जखमी प्रवाशी रुग्णालयात दाखल
Wandre Station stampede
वांद्रे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 9 प्रवासी जखमीPudhari File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या झालेल्या चेंगराचेंगरीत 9 प्रवासी जखमी झाले आहेत. वांद्रे स्टेशनवरुन गोरखपूरकडे जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये चढताना प्लॅटफॉर्मलवर ही चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 2 प्रवासी गंभीर जखमी झाली आहे. यामधील जखमी रुग्णांना स्टेशनवरील असणाऱ्या प्रवाशांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे उत्तर प्रदेश,बिहारकडे जाणार्या मेल-एक्सप्रसे गाड्यांना मोठी गर्दी आहे. रविवारी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी बांद्रा टर्मिनसहून गोरखपूर एक्सप्रेस सुटणार होती. या एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी प्रवासी रात्रीपासूनच स्थानकात आले होते. एक्सप्रेस प्लॅटफॉर्मला लागताच ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली. याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अपघाताची माहितेचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने सोशल मिडीया हँन्डल 'एक्स'वर दिली आहे. गोरखपूर ट्रेनची वेळ बदलण्यात आल्याने प्रवाशांची धावपळ झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे समजते.

प्रवाशांची संख्या जास्त असल्याने एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये शब्बीर अब्दुल रहमान (४०), परमेश्वर सुखदार गुप्ता (२८), रवींद्र हरिहर चुमा (३०), रामसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती (२९), संजय तिलकराम कांगे (२७), दिव्यांशु योगेंद्र (१८), मोहम्मद शरीफ शेख (२५), इंद्रजीत साहनी (१९) आणि नूर मोहम्मद शेख (१८), अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सणांच्या काळात घरी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी होते. वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेस गाडी वांद्रे रेल्वे स्थानकावर येताच, प्रवाशांची आत चढण्याची धडपड सुरू झाली. तेथे उपस्थित पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दी एवढी होती की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news