मी पक्ष सोडणार नाही : अबू आझमी यांचे स्पष्टीकरण

मी पक्ष सोडणार नाही : अबू आझमी यांचे स्पष्टीकरण

मुंबई : पक्षाच्या हायकमांडबाबत कोणतीही नाराजी नसून मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. हवे तर मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असे स्पष्टीकरण समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मंगळवारी दिले. मात्र, आमच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत किमान एक-दोन जागा लढवायला पाहिजे होत्या, अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे केल्याची माहिती त्यांनी दिली.

अबू आझमी समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर आझमी राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी अटकळ बांधण्यात आली होती. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना आपण पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news