शिवसैनिकांची नाराजी योग्यच : रामदास आठवले | पुढारी

शिवसैनिकांची नाराजी योग्यच : रामदास आठवले

मुंबई: पुढारी वृत्तसेवा ; महायुतीच्या सभेतील बॅनरवर बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो नसल्याने शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी व्यक्त केलेल्या संतप्त नाराजीचे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी समर्थन केले. महायुतीचे ईशान्य मुंबईत लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

दोन दिवसांपूर्वी महायुतीचे कोटेचा यांच्या मुलुंड येथील जाहीर सभेतील बॅनरवरून शिवसैनिकांनी गोंधळ घातला होता. ही नाराजी योग्य असल्याचे सांगत आठवले यांनी शनिवारच्या सभेत भाजपालाच घरचा आहेर दिला. पूर्व उपनगरात कोकणची माणसे मोठ्या प्रमाणात राहतात. हीच कोकणची माणसे महायुतीला मतांची झोळी भरून देतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Back to top button