Gold : सोने दरवाढीचा पाडव्याच्या खरेदीला ब्रेक; राज्यभरात केवळ 150 टन सोन्याची विक्री | पुढारी

Gold : सोने दरवाढीचा पाडव्याच्या खरेदीला ब्रेक; राज्यभरात केवळ 150 टन सोन्याची विक्री

नवी मुंबई ः राजेंद्र पाटील :  गुढीपाडव्याच्या मूहूर्तावरच सोने ( Gold ) प्रचंड महागल्याने त्याचा फटका सराफ बाजाराला राज्यभर बसला. राज्यात मंगळवारी केवळ 150 टन सोन्याची विक्री झाली.

तोळ्याचा भाव जळगाव आणि पुण्यात 72 हजार 200 रुपये तर मुंबईत 73 हजार 900 रुपये होता. या महागाईने सोने खरेदीला अक्षशः ब्रेक लावला.. गुढी पाडव्याच्या मूहूर्तावर हमखास सोने खरेदी करणार्‍या ग्राहकांना सराफ बाजाराकडे पाठ फिरवली.
दिवसभरात राज्यात 450 ते 500 टन तर मुंबईत 300 टन सोन्याची विक्री होईल, अशी अपेक्षा इंडीया बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीशी बोलताना सोमवारी व्यक्त केली होती. प्रत्यक्षात जेमतेम 150 टन विक्री झाल्याची माहिती प्रसिध्द रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका यांनी दिली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ग्राहकांची संख्येत मोठी घट झाली असली तरी दरात वाढ झाल्याने उलाढालीवर फारसा परिणाम झाले नसल्याचे रांका म्हणाले. Gold तोळ्याचा भाव विक्रमी उंचीवर पोहोचल्याने गुढीपाडव्याच्या मूहूर्तावरच सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले.5 ग्रँम सोन्यासाठी 40 हजार रुपये खर्च करण्यास देखील ग्राहक तयार नसल्याचे दिसलेे. जूने दागीने मोडीत काढून नवीन सोने खरेदी करण्यावर भर देण्यात आला. रविवार आणि सोमवार या दोन दिवसांतच राज्यामध्ये तब्बल 180 टन मोड सराफा बाजारात आली.

Back to top button