महायुतीत तडजोडी कराव्या लागता; संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया | पुढारी

महायुतीत तडजोडी कराव्या लागता; संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. महायुतीत तडजोडी कराव्या लागतात अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली.

वरिष्ठ पातळीवर बैठक होणार असल्याची माहिती माहिती शिरसाट यांनी दिली. कोणत्याही नेत्यावर अन्याय होणार नाही. शिंदे गटानं महायुतीत तडजोडी कराव्या लागता असंही शिरसाट म्हणाले. येत्या आठ दिवसांमध्ये अनेक स्पष्ट होतील असंही ते म्हणाले. त्याचबरोबर राज ठाकरे यांची घेतलेली भेट ही वैयक्तीक होती. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा नसल्याचे ते म्हणाले.

Back to top button