जरांगे-पाटील यांना लाेकसभेची उमेदवारी द्या : 'वंचित'चा प्रस्ताव | पुढारी

जरांगे-पाटील यांना लाेकसभेची उमेदवारी द्या : 'वंचित'चा प्रस्ताव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनोज जरांगे-पाटील यांना जालना लाेकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्‍यात यावी, असा प्रस्ताव मविआला दिला आहे, अशी माहिती माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते  धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज माध्‍यमांशी बाोलताना दिली.

आगामी लोकसभा निवडणूकीमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या हालचली वाढल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीने आज (दि.  त्यांच्या जागावाटपाबाबत मोठी माहिती दिली. मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव मविआला दिल्‍याचे  वंचितचे प्रवक्ते नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणूकीसाठी ४८ पैकी २७ जागांवर लढण्याची आमची  ताकद असल्याचेही ते म्‍हणाले.

Back to top button