‘मी जरांगे यांना भेटलो, पण…’ शरद पवार यांचा मोठा खुलासा | पुढारी

'मी जरांगे यांना भेटलो, पण...' शरद पवार यांचा मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्याशी असलेल्या संबंधांवर मोठा खुलासा केला. ते बोलताना म्हणाले की मी जरांगे पाटील यांना भेटलो पण, माझा जरांगेंशी काहीही संबंध नाही. जसे आमचे फोन तपासले जातात त्याप्रमाणे त्यांचेही तपासा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

जरांगेनी उपोषण केल्यावर मी एकदाच भेटलो, त्यानंतर कधीच भेटलो नाही. माझा जरांगेंशी काही संबंध नाही असं स्पष्टपणे पवार यांनी सांगितले. आमचे फोन तपासता तसे त्यांचेही तपासा असा टोला देखील सरकावर लगावला.

राजेश टोपे यांच्यावरचे आरोप खोटे आहेत. एकीकडे टोपेंची मदत घेतात, दुसरीकडे टीका करतात. जबाबदार लोक पोरकट पणा करत आहेत. कर नाही त्याला डर कशाला अशी प्रतिक्रिया देखील दिली.

महाराष्ट्राची अशी स्थिती पूर्वी कधीही झालेली नव्हती. जागावाटपाबाबत लवकरच निर्णय होणार आहे. समविचारी पक्षांना एकत्र घेऊन काम करणार असल्याचेही पवार यावेळी म्हणाले. प्रकाश आंबेडकरांनी आमच्या सोबत यावं असंही पवार म्हणाले.

Back to top button