‘राज्यात गुंडाराज’ : घोसाळकर हत्याकांडावर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया | पुढारी

'राज्यात गुंडाराज' : घोसाळकर हत्याकांडावर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपूर्वी उल्हासनगर येथे गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा मुंबईत राजकीय नेत्याचा खून केल्याची घटना घडली. या खूनानंतर महाराष्ट्रात गुंडराज अवतरल़्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियामध्ये पहायला मिळत आहेत.

उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांचा गोळीबारानंतर मृत्यू झाला. या गोळीबार प्रकरणातील मारेकरी मॉरिस याने स्वत:चे जीवन संपवले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर आहे. या खूनाबाबत सखोल तपास पोलीस करत आहेत. घोसाळकर खून प्रकरणातील मृत मॉरिस ‘शिंदे’ गटात प्रवेश करणार होता अशी चर्चा देखील होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर ही चर्चा सुरु झाली. मात्र याबाबत कोणतीही माहिती अद्याप नाही. या घटनेने महाराषट्रात सुरु असलेल्या राजकीय नेत्यांच्या गोळीबार प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर संताप व्यक्त करत प्रतिक्रिया येत आहेत. अशा प्रकारच्या गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे.

नेमकं प्रकरण काय घडलं?

गोळीबारापूर्वी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरोन्हा यांनी फेसबुक लाईव्ह केलं होतं. त्यानंतर मॉरिस उठला आणि त्यानं अभिषेक यांच्यावर गोळीबार केला. यात अभिषेक यांना चार गोळ्या लागल्या होत्या. तर, मॉरिसने स्वत:वर चार गोळ्या झाडून घेतल्या.

Back to top button