घोसाळकर हत्या प्रकरण : मृत मॉरिसचा ‘शिंदे’ गटात होणार होता प्रवेश? मुख्यमंत्र्यासोबतच्या फोटोने खळबळ | पुढारी

घोसाळकर हत्या प्रकरण : मृत मॉरिसचा 'शिंदे' गटात होणार होता प्रवेश? मुख्यमंत्र्यासोबतच्या फोटोने खळबळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांचा गोळीबारानंतर मृत्यू झाला. या गोळीबार प्रकरणातील मारेकरी मॉरिसने देखील आपले जीवन संपवले आहे. या प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. मृत मॉरिस ‘शिंदे’ गटात प्रवेश करणार होता अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर ही चर्चा सुरु झाली. मात्र याबाबत कोणतीही माहिती अद्याप नाही.

 या  घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.  या प्रकरणाचे नेमके ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ आणि फोटोंवरुन अनेक अंदाज बांधले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये पैशाच्या वादातून खून झाल्याचे देखील सांगितले जात आहे. कोरोना योद्धा म्हणवत समाजसेवक अशी ओळख सांगणारा मॉरिस याने देखील स्वत:

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा  मॉरिस नरोन्हा चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर गेल्याचा एक फोटो समोर आला आहे. मुख्यमंत्री त्याला भेटल्याचे यामध्ये दिसून येते. मॉरिस याला मुख्यमंत्री शिंदे यांनी सेनेत येण्याचे आमंत्रण देखील दिल्याची चर्चा आहे. आज त्याने अभिषेकवर घोसाळकर यांच्यावर गोळ्या घालून खून केली आहे.

Back to top button