फेसबुक लाईव्हमध्ये गोळ्या झाडत माजी नगरेसवक घोसाळकरांची हत्या; मारेकऱ्याने केली आत्महत्या, लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून प्रकार?

फेसबुक लाईव्हमध्ये गोळ्या झाडत माजी नगरेसवक घोसाळकरांची हत्या; मारेकऱ्याने केली आत्महत्या, लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून प्रकार?
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांचा गोळीबारानंतर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती चिंताजनक असल्याने दहिसर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करुन जीवन संपवले होते.

उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना गोळीबार केल्याची घटना आज (दि. ८) घडली. पैशाच्या वादातून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. मॉरिस भाई या व्यक्तीने हल्ला करुन स्वत:चे जीवन संपवले. गोळीबारानंतर घोसाळकर यांना दहिसर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. (Abhishek Ghosalkar)

फेसबुक लाईव्हमध्ये गोळीबारचा थरार | Abhishek Ghosalkar Firing

गुरुवारी (दि. ८) सायंकाळी अभिषेक घोसाळकर हे मॉरीसच्या दहिसर येथील एमएचबी, आयसी कॉलनीतील कार्यालयात आले होते. यावेळी या दोघांनी आपसांतील वाद मिटवून पुन्हा एकत्र काम करण्याचा निर्धार केला होता. त्यानंतर ते दोघेही फेसबुक लाईव्हमध्ये आले होते. काही वेळानंतर मॉरीस हा बाहेर गेला आणि त्याने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून अभिषेकच्या दिशेने गोळीबार केला. त्यात अभिषेकला तीन गोळ्या लागल्या. गोळीबारानंतर मॉरीसने त्याच्या कार्यालयात स्वतवर गोळी झाडून जीवन संपवले. अचानक झालेल्या गोळीबाराने तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Abhishek Ghosalkar)

लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून प्रकार?

गोळीबाराची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या अभिषेकला करुणा तर मॉरीसला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मॉरीसला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले होते तर अभिषेकवर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने काही वेळानंतर अभिषेकला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. लैगिंक अत्याचाराची खोटी तक्रार करण्यामागे अभिषेकचा हात होता असे मॉरीसला वाटत होता. त्याचा त्याच्या मनात प्रचंड राग होता. त्यामुळे अभिषेकला संपविण्यासाठी त्याने त्याच्यावर गोळीबार करुन स्वतवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे बोलले. दुसरीकडे गोळीबारामागे अन्य काही कारण आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.(Abhishek Ghosalkar)

मारेकरी मॉरीसभाई कोरोना योद्धा तसेच समाजसेवक म्हणून परिचित

स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या गोळीबाराच्या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. घोसाळकर यांच्या कार्यकर्त्यांन मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. तपासात मॉरीस हा परिसरात मॉरीसभाई म्हणून परिचित होता. तो स्वतला कोरोना योद्धा तसेच समाजसेवक म्हणून परिचित होता. भाजपा आमदार सुनिल राणे यांचा तो जवळचा पदाधिकारी म्हणून ओळखला जात होता. आगामी महानगरपालिकेची निवडणुकीसाठी तो भाजपातर्फे निवडणुक लढविण्याच्या तयारीत होता असेही बोलले जाते.(Abhishek Ghosalkar)

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news