Devendra Fadnavis : राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हावरील निकालानंतर फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले... | पुढारी

Devendra Fadnavis : राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हावरील निकालानंतर फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष, चिन्ह निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी अजित पवार गटाचे अभिनंदन केले.

फडणवीस म्हणाले की, आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली, मी त्यांचे, सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.

अजित पवार यांची निवडणूक आयोगाच्या निकालानंतर प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या निर्णयाचे आम्ही स्वागत करत निवडणूक आयोगाचे आभार मानले. पक्षसंघटनेवर आम्ही आता लक्ष देणार असल्याची भूमिका अजित पवार यांनी मांडली. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या निर्णयानंतर अजित पवार यांची भूमिका जाहीर केली. ते म्हणाले की, ‘आम्ही चांगल्या वकीलाच्या सहाय्याने न्यायालयीन लढाई लढू.’

Back to top button