पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगाच्या निकालानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा निकाल अपेक्षित होता असे सांगत आम्ही या निर्णयाविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत अशी प्रतिक्रिया दिली.
सुळे म्हणाल्या की, शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचे झाले. निकालामागे अदृश्य शक्ती आहे. मला निकालाचं आश्चर्य वाटत नाही. हा निकाल अपेक्षित होता. हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठे षडयंत्र आहे. वडिलांच्या नावावर घर असेल तर वडिलांना घरातून बाहेर काढणार आहे का? असा सवाल यावेळी सुळे यांनी उपस्थित केला. आम्ही याविरोधात सुप्रिम कोर्टात जाणार आहोत अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. साहेबांचा पक्ष दुसऱ्याने ओरबाडून नेला आहे. पण कुठेही जा राष्ट्रवादी म्हटलं की साहेबांचचं नाव समोर येईल असही सुळे यांवेळी म्हणाल्या.