मुंबई : धारावीकरांच्या पुनर्वसनाला मुलुंडकरांचा विरोध; मानवी साखळी करून निदर्शने

धारावीकरांच्या पुनर्वसनाला मुलुंडकरांचा विरोध
धारावीकरांच्या पुनर्वसनाला मुलुंडकरांचा विरोध

भांडुप ; पुढारी वृत्‍तसेवा मुलुंड मध्ये मुंबई मनपाच्या तयार होणाऱ्या प्रकल्पबाधितांच्या वसाहतीला आणि धारवीकरांचे मुलुंड मध्ये होणाऱ्या पुनर्वसन ला मुलुंडकरांनी जोरदार विरोध सुरु केला आहे. या आगोदर विविध पद्धतीने आंदोलने झाल्यानंतर आज (रविवार) सकाळी मुलुंड मधील नागरिकांनी मूक मानवी साखळी आंदोलन केले. मुलुंडच्या छत्रपती संभाजी महाराज मैदानाच्या बाजूला शेकडो मुलुंडकर एकत्र आले.

हाती फलक घेऊन शेकडोच्या संख्येने मुलुंडकरांनी या मानवी साखळी आंदोलनात सहभाग घेतला. या प्रकल्पबाधितांना इतक्या मोठ्या प्रमाणात मुलुंड मध्ये आणले तर इथल्या व्यवस्थेवर ताण येईल, त्यामुळे इथे आधीपासून राहत असलेल्या मुलुंडकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल, म्हणून आम्ही हा विरोध सुरूच ठेवणार आहोत. हा लादलेला प्रकल्प थांबला नाही तर मतदानावर ही बहिष्कार करू अशी भूमिका या वेळी मुलुंडकरांनी मांडली आहे. तसेच आता शांततेत केलेल्या आंदोलनांनंतर ही सरकारला जाग येत नसेल तर हे आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने होईल असे या वेळी येथील रहिवासी सागर देवरे म्हणाले. त्यामुळे या बाबत आता सरकार आणि प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्व मुलुंडकरांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news