उद्धव ठाकरे कोकण दौर्‍यावर, सूर्यकांत दळवी भाजपमध्ये

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौर्‍यावर असून या दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी भाजपने त्यांना धक्का दिला आहे. दापोली-मंडणगड मतदारसंघाचे सलग 25 वर्षे आमदार राहिलेले सूर्यकांत दळवी यांच्यासह विविध पदाधिकार्‍यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी सूर्यकांत दळवी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, अनेक पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.

सूर्यकांत दळवी, शांताराम पवार, प्रकाश शिगवण यांच्या प्रवेशाने कोकणात भाजपला मोठे बळ मिळणार आहे. कोकणातील विकासाचे प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचे जोरदार प्रयत्न केले जातील. त्याचवेळी कोकणच्या विकासाचा ध्यास घेतलेले उमदे नेते अशा शब्दांत मंत्री चव्हाण यांनी दळवी यांचे कौतुक केले.

उद्धव ठाकरेंनी उपेक्षा केल्याची सल

तब्बल 25 वर्षे आमदार असूनही उद्धव ठाकरे यांनी केवळ एका पराभवानंतर माझ्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले. आपण निःस्वार्थ भावनेने भाजपमध्ये दाखल झालो आहोत. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू, असा शब्द त्यांनी दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news