मनाेज जरांगेंच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य; वाशीत मराठा आंदोलकांचा जल्‍लोष | पुढारी

मनाेज जरांगेंच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य; वाशीत मराठा आंदोलकांचा जल्‍लोष

मुंबई ; पुढारी ऑनलाईन गेल्‍या अनेक दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष संपला. रात्री उशिरा सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्‍या. सरकारच्या अध्यादेशानंतर मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मराठा समाजाकडून जल्‍लोष केला जात आहे. मोठ्या संघर्षानंतर जरांगेंच्या स्‍वागतासाठी जेसीबी आणण्यात आले असून, यातून फुलांची उधळण होणार आहे. या ठिकाणच्या एपीएमसी मार्केटमध्येच मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे काल त्‍यांनी घेतलेल्‍या निर्णयाची माहिती सर्व मराठा समाजासमोर मांडणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री स्‍वत:हा उपोषणस्‍थळी येउन जरांगेंचे उपोषण सोडवणार आहेत.

दरम्‍यान सरकारने जरांगे यांच्या सर्व मागण्या माण्य केल्‍याने एपीएमसी मार्केटच्या ठिकाणी मराठा समाजाचा मोठा जल्‍लोष साजरा केला जात आहे. अण्णासाहेब पाटील यांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशी भूमीका काही आंदोलकांनी यावेळी व्यक्‍त केला.

 

Back to top button