स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर | पुढारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. या सुनावणीची नवी तारीख ही आता ४ मार्च असण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी आता थेट लोकसभा निवडणुका नंतरच होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ही सुनावणी ९ जानेवारीला होणार होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणीची संभाव्य तारीख ४ मार्च दाखवण्यात आली आहे. यापूर्वीही काही वेळा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, ४ मार्च पर्यंत लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक घोषित झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाले तर लोकसभा निवडणुका झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येणार नाही. ही गुंतागुंत पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीच्या नंतरच होतील अशी शक्यता आहे.

Back to top button