चेंबूरमध्ये घराला लागलेल्या आगीत कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू!

शॉटसर्किटमुळे लागली आग
7 people died in a house fire in Chembur's Siddharth Colony!
चेंबूरमध्ये घराला लागलेल्या आगीत कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू! File Photo
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

चेंबूरच्या के. एन. गायकवाड मार्गावरील सिद्धार्थ कॉलनीत आज (रविवार) पहाटे ५:२० च्या दरम्यान शॉटसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत साखरझोपेत असतांना गुप्ता कुटुंबियातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला असून त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे.

के. एन. गायकवाड मार्गावरील सिद्धार्थ कॉलनी येथे गुप्ता कुटुंबियांचे तळ अधिक एक मजली घर असून तळाला दुकान तर पहिल्या मजल्यावर ते राहतात. रविवारी पहाटे ५: २० वाजण्याच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यावेळी गुप्ता कुटुंबीय झोपेत होते. शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला व चेंबूर पोलिसांना घटनास्थळी पाचरण केले. अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले. जखमींना घाटकोपरच्या राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी गुप्ता कुटुंबातील सातही जण मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृतांची नावे

१) प्रेसी प्रेम गुप्ता (६)

२) मंजू प्रेम गुप्ता (३०)

३) अनिता धर्मदेव गुप्ता (३९)

४) प्रेम चेडीराम गुप्ता (३०)

५) नरेंद्र गुप्ता (१०)

६) विधी चेडीराम गुप्ता (१५)

७) गीतादेवी धर्मदेव गुप्ता (६०)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news