Festival Enforcement Calendar | महाप्रसाद, इफ्तार, लंगरसाठीही द्यावी लागणार ७ दिवस आधी सूचना

एफडीएचे ‘फेस्टिव्हल एन्फोर्समेंट कॅलेंडर’ लागू
Festival Enforcement Calendar |
Festival Enforcement Calendar | महाप्रसाद, इफ्तार, लंगरसाठीही द्यावी लागणार ७ दिवस आधी सूचना
Published on
Updated on

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता वर्षभरातील सर्व सण, उत्सव, जत्रा, उरूस आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी कायमस्वरूपी ‘फेस्टिव्हल एन्फोर्समेंट कॅलेंडर’ लागू केले आहे. याअंतर्गत लग्न समारंभ, महाप्रसाद, इफ्‍तार पार्टी आणि लंगरसह सवर्च मोठ्या कार्यक्रमांच्या किमान सात दिवस आधी संबंधित अधिकाऱ्याला पूर्वसूचना देणे बंधनकारक करण्‍यात आले आहे.

राज्यात हा असा पहिलाच आदेश असून, यापुढे प्रत्येक सणासाठी स्वतंत्र आदेश काढला जाणार नाही. प्रत्येक सणासाठी भेसळीच्या दृष्टीने संवेदनशील खाद्यपदार्थ, त्‍यात भेसळ होण्‍याची शक्‍यता आणि प्राधान्याने घ्यायचे नमुने हे निश्चित केले आहे.

२१ दिवस आधीपासून कारवाई

एफडीएने अंमलबजावणीसाठी चार टप्प्यांची कार्यपद्धती आखली आहे. सणाच्या २१ दिवस आधीपासून ते सणानंतर ३० दिवसांपर्यंत तपासणी, नमुना संकलन आणि आवश्यक कारवाई केली जाणार आहे.

११ संवेदनशील बाबींवर लक्ष

उपवासाचे पदार्थ, दूध व दुग्धजन्य पदार्थ, मांस, पाणी व बर्फ, मिठाई, खाद्यरंग व चांदीचा वर्ख, खाद्यतेल, फळे पिकविण्याची प्रक्रिया, सुका मेवा, सामूहिक अन्नवाटप, बेकरी, ई-कॉमर्स आणि आयातीत खाद्यपदार्थ अशा ११ संवेदनशील बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

* महाप्रसाद, इफ्तार पार्टी, अन्नछत्र, लंगर व भंडारा अशा ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी भेट देऊन अन्नाचा दर्जा, स्वच्छता, कच्च्या मालाची गुणवत्ता, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तंदुरुस्ती तसेच कॅटरर्सच्या परवान्याची पडताळणी करणे बंधनकारक.

* लग्न समारंभ, मोठ्या कार्यक्रमांत भोजन व्यवस्था करणाऱ्या कॅटरर्सकडे व्यवसायासाठी वैध परवाना किंवा नोंदणी बंधनकारक.

* कार्यक्रमाच्या किमान सात दिवस आधी संबंधित अधिकाऱ्याला पूर्वसूचना देणे आवश्यक.

* आयोजकांना वैध परवानाधारक कॅटरर्समार्फतच अन्न तयार करून त्याचे वाटप करणे बंधनकारक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news