कलम ३७० रद्द करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

कलम ३७० रद्द करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण : मुख्यमंत्री शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलम ३७० रद्द कायम करण्याबाबतच्या निर्णयावर बोलत असताना आज (दि. ११) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी त्यांनी बोलताना कलम ३७० हटवणं हे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया दिली.

मोदी साहेबांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे. हा निर्णय योग्य असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणं गरजेचं असतं. आमचं सरकार हे शेतकऱ्यांसाठी काम करणारं सरकार आहे. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी घरातून बाहेर पडावं अशी टीका देखील त्यांनी केली. तसेच घरी बसून काम होत नसंत असा टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला.

Back to top button